
संभाजी ब्रिगेडचा निर्धार — निकराने लढू!
पाथर्डी येथे संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांची ताकद दाखवणारी आढावा बैठक
राजेश परकाळे (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) म्हणाले –
“शेतकऱ्यांना न्याय मिळायलाच हवा, महिलांना रोजगाराच्या संधी वाढवाव्यात. आम्ही ‘विचारांची लढाई’ लढतो आहोत… आणि ती लढाई आता अधिक तीव्र होणार!”
“संभाजी ब्रिगेड ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, भगवान महादेव – हेच आमचे श्रद्धास्थान!
शिवधर्म म्हणजे विचारांचं आचरण – तो ना नवीन, ना बनावटीचा… तो ‘पुरातन’ आहे!”
— बाळासाहेब सोनाळे (मराठा सेवा संघ)
प्रमुख उपस्थिती:
श्रीगोंदा तालुकाध्यक्ष शाम जरे
जिल्हा उपाध्यक्ष रिजवान शेख
जिल्हा महासचिव निलेश बोरुडे
जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा नंदिनी सोनाळे
तालुकाध्यक्ष डॉ. राहुल देशुमख
व अन्य तालुका कार्यकर्ते – कोरडगाव, कोळसांगवी, तिसगाव, माळीबाभुळगाव, औरंगपूर आदी ठिकाणहून मोठ्या संख्येने हजेरी
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना आणि समारोप राष्ट्रगीताने
संभाजी ब्रिगेडचा आवाज – विचारांनी, कार्यकर्त्यांनी आणि लोकहिताच्या मुद्द्यांनी बुलंद होतोय!