के.के. रेंजचं भूत पुन्हा जागं झालं! – २३ गावातील शेतकऱ्यांची मानगुटीवर चिंता
अहिल्यानगर / पारनेर / राहुरी – गेल्या काही वर्षांपासून थंडबस्त्यात गेलेला के.के. रेंजचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
के.के. रेंजचं भूत पुन्हा जागं झालं! – २३ गावातील शेतकऱ्यांची मानगुटीवर चिंता ![🚨]()
![🔥]()
अहिल्यानगर / पारनेर / राहुरी – गेल्या काही वर्षांपासून थंडबस्त्यात गेलेला के.के. रेंजचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पारनेर, नगर आणि राहुरी तालुक्यातील तब्बल २३ गावे पुन्हा संरक्षण विभागाच्या मैदानी व तोफखाना सरावासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १२ सप्टेंबर २०२५ रोजी नोटीस जारी केली असून, १५ जानेवारी २०२६ ते १४ जानेवारी २०३१ या काळात ही गावे युद्धसरावासाठी वापरण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांमध्ये पुन्हा धास्ती!
या नोटीसमुळे शेतकऱ्यांच्या अंगावर पुन्हा भीतीचं सावट आलं आहे.
जिवंत दारुगोळा वापरून सराव या जमिनींवर होणार असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत.
“आपल्या पोटाच्या भाकरीवर कुणीतरी सराव करतोय का?” असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
आधीही पेटला होता वाद
के.के. रेंजच्या नोटिसा याआधीही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्या वेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार नीलेश लंके, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली होती.
काही काळ हा मुद्दा शांत झाला होता… पण आता पुन्हा “भूत जागं झालं” असं लोक म्हणू लागले आहेत. ![👻]()
नोटीशीत काय म्हटलंय?
या गावी कायमस्वरूपी स्थलांतर होणार नाही.
सरावाच्या दिवसांमध्येच महसूल अधिकारी धोकादायक क्षेत्र म्हणून जाहीर करतील.
सराव संपल्यावर गावे पुन्हा सामान्य जीवनासाठी खुली राहतील.
यामध्ये भूसंपादन किंवा पुनर्वसनाचा प्रश्न नाही, फक्त सरावासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून ठेवण्यात आलंय.
गावांचा तपशील
अहिल्यानगर तालुका (६ गावे)
देहेरे, इस्लामपूर, शिंगवे, नांदगाव, सुजलपूर, घाणेगाव
२९१.२७ हेक्टर खासगी जमीन, १५०.८५ हेक्टर सरकारी, ११३.११ हेक्टर वनक्षेत्र
राहुरी तालुका (१२ गावे)
बाभुळगाव, जांभुळबन, जांभळी, वरवंडी, बारागाव नांदूर, कुरणवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, गडाखवाडी, ताहाराबाद, दरडगाव थडी, वावरथ
४,१३०.६४ हेक्टर खासगी, २,२६०.५२ हेक्टर सरकारी, ५,६५७.७६ हेक्टर वनक्षेत्र
पारनेर तालुका (५ गावे)
वनकुटे, पळशी, वडगाव-सावताळ, गाजदीपूर, ढवळपुरी
५,६७७.०५ हेक्टर खासगी, १,१८५.७४ हेक्टर सरकारी, ५,४५२.७५ हेक्टर वनक्षेत्र
ग्रामस्थ काय म्हणतात?
“सरावासाठी अधूनमधून गावे रिकामी करायची, शेतात काम थांबवायचं, गुरं-ढोरं दूर ठेवायचं… यामुळे नुकसान तर होईलच, शिवाय कायम भीतीचा माहोल राहील” – अशी ग्रामस्थांची प्रतिक्रिया.
लोकांना माहिती कुठे मिळेल?
संबंधित गावे, सर्व्हे नंबर, गट नंबर आणि वनक्षेत्र याची संपूर्ण यादी:
-
तहसील कार्यालय
-
तलाठी कार्यालय
-
पंचायत समिती
-
ग्रामपंचायत
-
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय
तसेच जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध – ahilyanagar.maharashtra.gov.in

के.के. रेंजचं भूत पुन्हा जागं झालं! – २३ गावातील शेतकऱ्यांची मानगुटीवर चिंता
अहिल्यानगर / पारनेर / राहुरी – गेल्या काही वर्षांपासून थंडबस्त्यात गेलेला के.के. रेंजचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पारनेर, नगर आणि राहुरी तालुक्यातील तब्बल २३ गावे पुन्हा संरक्षण विभागाच्या मैदानी व तोफखाना सरावासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १२ सप्टेंबर २०२५ रोजी नोटीस जारी केली असून, १५ जानेवारी २०२६ ते १४ जानेवारी २०३१ या काळात ही गावे युद्धसरावासाठी वापरण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांमध्ये पुन्हा धास्ती!
या नोटीसमुळे शेतकऱ्यांच्या अंगावर पुन्हा भीतीचं सावट आलं आहे.
आधीही पेटला होता वाद
नोटीशीत काय म्हटलंय?
या गावी कायमस्वरूपी स्थलांतर होणार नाही.
गावांचा तपशील
२९१.२७ हेक्टर खासगी जमीन, १५०.८५ हेक्टर सरकारी, ११३.११ हेक्टर वनक्षेत्र
ग्रामस्थ काय म्हणतात?
लोकांना माहिती कुठे मिळेल?
मेट्रो पोर्टलचा सवाल –

तुमचं मत काय? – के.के. रेंज बंद व्हायला पाहिजे का?