“सामान्य कार्यकर्त्याचा ऐतिहासिक प्रवास!”

✨ रवींद्र चव्हाण झाले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष!

🔥 “सामान्य कार्यकर्त्याचा ऐतिहासिक प्रवास!”

✨ रवींद्र चव्हाण झाले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष!

📍 मुंबई | मोठी राजकीय घडामोड
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपने आपला नवा कर्णधार जाहीर केला आहे. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांसारख्या मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण साजरा झाला.


🗣️ “२००२ मध्ये सामान्य कार्यकर्ता होतो, आज प्रदेशाध्यक्ष झालो!” – चव्हाण

रवींद्र चव्हाण यांनी भावूक होत म्हणाले –

“ही जबाबदारी माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. भाजप हा असा एकमेव पक्ष आहे, जिथे चहावाला पंतप्रधान होतो, आणि सामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष!”


🔥 भाजपचं बिनधास्त उत्तर – घराणेशाहीला नाही, कार्यकर्त्याला हक्क!

देवेंद्र फडणवीस म्हणाले –

“आमच्या पक्षात अध्यक्ष रक्ताच्या नात्यातून नाही, कार्यातून निवडले जातात. विरोधकांची आठवण फक्त निवडणुकीत मराठी माणसाची होते!”

नितीन गडकरींचाही फटकारा –

“रवींद्र चव्हाण एकेकाळी रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते, तर बावनकुळे रिक्षाचालक! भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, याचं हे उत्तम उदाहरण आहे.”


🔎 रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता ते अध्यक्ष प्रवास :

  • २००५ : कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक

  • २००९ ते २०२4 : सलग चार वेळा आमदार

  • सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी

  • आता भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा


📣 #RavindraChavan #BJPMaharashtra #PoliticalUpdate #Fadnavis #Gadkari #YouthPower #ViralPolitics #MetroNewsExclusive