अहमदनगर :
अहमदनगर नगर शहरातील जीपीओ चौकात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून बनावट डिझेल जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास शहर विभागाचे उपाधीक्षक विशाल ढुमे हे करत होते. मात्र गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटले तरी तपासात प्रगती न झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे हा तपास वर्ग केला होता.
या प्रकरणात डिझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार शब्बीर आणि त्याचा मुलगा मुदस्सर असल्याचे समोर आले होते. हे दोघेही स्वतःहून पोलिसात हजार झाले, पोलिसांनी त्यांना अटक केली असून शब्बीर देशमुख त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख स्वतः होऊन पोलिसात हजर झाले आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयात हजर केले असता 14 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.