राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती 

औरंगाबाद :

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येईल अशी सगळीकडे चर्चा रंगली आहे. याच विधानाची आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुष्टी केली आहे. 
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली आहे. याचा अर्थ लाट येईलच असे नाही, अशी सारवासारव करतानाच ही लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केलं आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली होती. ती येईलच असे नाही. पण लाट आली तरी प्रशासन सज्ज आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.