
१ लिटर तेलाची किंमत तब्बल ₹13 लाख!
दमास्क गुलाबाची (Damask Rose) शेती उत्तराखंडमधील डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान! पारंपरिक शेतीपेक्षा अनेक पट अधिक उत्पन्न देणाऱ्या या गुलाबामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चित्रच बदलले आहे.
या गुलाबापासून मिळणाऱ्या इसेंशिअल ऑइलची किंमत प्रति लिटर ₹13 लाख, कारण यासाठी हजारो किलो फुलांची गरज भासते.
तेलाचा वापर अत्तर, परफ्यूम, स्किनकेअर, अरोमा थेरपी, आणि कॉस्मेटिकमध्ये होतो.
कॅनडा, दुबई, युरोप, ऑस्ट्रेलियात निर्यात, तर दिल्ली-मुंबईतील मोठ्या ब्रँड्स यावर अवलंबून!
2021 पासून सुरू झालेल्या प्रकल्पात 1600+ शेतकरी सहभागी
CAP (Center for Aromatic Plants) संस्थेच्या मार्गदर्शनाखाली लागवड क्षेत्र 100 हेक्टरवरून 150 हेक्टरपर्यंत वाढलं!
फेब्रुवारी ते मे – फुलांची काढणीचा योग्य काळ
कमी पाणी लागणारी शेती
बांधावर, आडोशाला, किंवा मिश्र शेतीमध्येही शक्य
प्रोसेसिंग युनिटसाठी अनुदान, प्रशिक्षण, रोपे – सगळं CAP मार्फत उपलब्ध!
इतिहास सांगतो, दमास्क गुलाबाची सुरुवात सीरियाच्या दमास्कस शहरात झाली.
मुगल काळात अत्तर व स्नानासाठी याचा वापर शाही घराण्यांमध्ये होत असे.
आजही आयुर्वेद आणि सुगंधी उद्योगात याला सर्वोच्च मान!
ही शेती म्हणजे हिरव्या सोन्याचं साम्राज्य!