रेशन कार्डधारकां नी सावध व्हा!

तुमचं कार्ड ‘या’ कारणामुळे रद्द होऊ शकतं!

⚠️
रेशन कार्डधारकां नी सावध व्हा!
तुमचं कार्ड ‘या’ कारणामुळे रद्द होऊ शकतं!

🧾 अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून महत्त्वाची सूचना!

देशभरात PDS अंतर्गत मोफत / अनुदानित दरात धान्य गरजू नागरिकांना दिलं जातं.
मात्र, काही लाभार्थी हे धान्य विक्रीसाठी वापरत असल्याचे प्रकार समोर आल्यामुळे आता शासनाची कडक कारवाई सुरू आहे.

🚫 धान्य विकणाऱ्यांचे रेशन कार्ड थेट रद्द होणार!
⛔ पुढील शासकीय अन्न योजनांचा लाभही मिळणार नाही.


🛑 कोणत्या कारणांमुळे रेशन कार्ड रद्द होऊ शकतं?

✅ एका कुटुंबाकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड
✅ बनावट माहिती / चुकीची कागदपत्रं
✅ मृत व्यक्तीच्या नावावर धान्य घेतलं जात असल्यास
✅ शासकीय धान्य व्यापाऱ्यांना विकल्याचे निदर्शनास आल्यास


🔍 काय सुरू आहे सरकारकडून?

🔸 लाभार्थ्यांची मालमत्ता, आर्थिक स्थिती, ओळखपत्रांची तपासणी
🔸 Aadhaar व मोबाईल नंबर लिंकिंग अनिवार्य
🔸 बायोमेट्रिक प्रणालीने वितरण
🔸 जिल्हा पुरवठा अधिकारी आणि निरीक्षकांकडून छापे आणि कारवाई


☔ पावसाळ्यानिमित्त विशेष निर्णय
जून, जुलै आणि ऑगस्टचं धान्य एकत्र दिलं जात आहे.
🛑 पण जर याचा गैरवापर करून धान्य विकलं, तर कठोर कारवाई निश्चित!


👨‍👩‍👧‍👦 नागरिकांनी काय करावं?
📌 रेशनचं धान्य केवळ आपल्या कुटुंबासाठी वापरा
📌 चुकीच्या नावावर धान्य घेत असल्यास त्वरित थांबा
📌 कोणताही गैरप्रकार जाणवल्यास तक्रार नोंदवा

🎯 शासनाचं उद्दिष्ट – पारदर्शकता आणि गरजूंना न्याय