अहिल्यानगर जिल्ह्यात मराठा आरक्षण रॅलीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त! 🔥

एकूण 850 पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत.

🔥
BIG UPDATE | अहिल्यानगर जिल्ह्यात मराठा आरक्षण रॅलीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त! 🔥

 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली 27 ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून सुरू होणारी ऐतिहासिक रॅली मुंबईच्या आझाद मैदानाकडे रवाना होत आहे. 🚩 या रॅलीत प्रचंड संख्येने समाजबांधव सहभागी होणार असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

👮‍♂️ शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रॅली नगर जिल्ह्यात दाखल होणार असून पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रॅलीचे मार्ग कर्‍हेटाकळी, शेवगाव शहर, वडुले, निंबे नांदूर, मिरी, पांढरीपूल, नेप्ती, टाकळी ढोकेश्वर, पारनेर आदी गावांमधून होणार आहे. 🚩

👉 एकूण 850 पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत. यात

  • 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक,

  • 3 उपअधीक्षक,

  • 14 पोलीस निरीक्षक,

  • 79 सहाय्यक व उपनिरीक्षक,

  • 639 पुरुष अंमलदार,

  • 80 महिला अंमलदार 👮‍♀️

  • तसेच दंगल नियंत्रण पथकाचा समावेश आहे.

याशिवाय BDDS पथकाद्वारे घातपातविरोधी तपासणी होणार आहे. 🚨 बॅरिकेड्स, वॉकी-टॉकी, शासकीय वाहने, दुर्बिणी, रस्सी इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

👉 जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे हे बंदोबस्ताचे प्रमुख प्रभारी असतील.

  • सेक्टर 1 – पोलीस उपअधीक्षक अमोल भारती (शिर्डी विभाग)

  • सेक्टर 2 – पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने (नगर ग्रामीण)

  • सेक्टर 3 – पोलीस उपअधीक्षक गणेश उगले (आर्थिक गुन्हे शाखा)

🚩 29 ऑगस्ट रोजी मुंबईत रॅलीचे आगमन होणार असून, लाखोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहतील.

👉 पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,
🔹 रॅलीदरम्यान शांती व संयम राखावा
🔹 कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी

🔥 अशा ऐतिहासिक रॅलीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष नगर जिल्ह्याकडे लागले आहे. मराठा आरक्षणासाठीची ही लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, रॅलीमुळे महाराष्ट्रात मोठी चर्चा रंगली आहे. 🚩

#MarathaReservation #MetroNews #Ahmednagar #BreakingNews #ManojJarange #MarathaRally ✊