upsc exam important update – METRO NEWS

UPSC परिक्षेत आता AI, पुजा खेडकर प्रकरणातून घेतली दखल, परीक्षा प्रक्रियेत बदल

लाखो विद्यार्थी यूपीएससी परिक्षा परिक्षेसाठी प्रयत्न करत असतात. युपीएससी दरवर्षी १४ परीक्षा घेत असते. त्यातून देशात प्रशासकांची भरती होते. या परीक्षांमध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी यूपीएससीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत फसवणूक करणाऱ्या उमेदवारांना आता आळा बसणार आहे. पुजा खेडकर यांनी विकलांग असल्याची खोटी ओळख वापरून आयएएस झाल्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर यूपीएससीने परीक्षेतील अनियमितता रोखण्यासाठी निर्णय घेतला आहे. त्यामध्ये युपीएससीचे काम हलके होण्यासाठी आता कृत्रिम बुध्दीमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. यूपीएससी परिक्षा दरवर्षी १४ परीक्षा घेण्यात येतात. त्यातून देशाला प्रशासक मिळतात. या परीक्षांमध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी यूपीएससीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी यूपीएससीने निविदा काढल्या आहेत. आधुनिक बायोमेट्रिक तंत्रज्ञान, आधार आधारित बोटांच्या ठशांची पडताळणी, चेहऱ्याची ओळख पद्धती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे सीसीटीव्ही देखरेख या तंत्रज्ञानाचा वापर परिक्षे दरम्यान करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील ५ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेत बसले होते. त्यामुळे परीक्षेची पारदर्शिता वाढविण्यासाठी ही पाऊले महत्त्वाची मानली जात आहेत. पुजा खेडकर यांनी खोटी ओळख वापरून आयएएस झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यूपीएससीने या निर्णयाला गती दिली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच यूपीएससीने परीक्षेची सुरक्षा कवच घट्ट करण्याचे ठरविले आहे. यामुळे पुढच्या परीक्षांमध्ये फसवणूक करणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे परीक्षेची निष्पक्षता आणि पारदर्शिता वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या देशभरात आयएएस पूजा खेडकरचे प्रकरण गाजत असताना यूपीएससीने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण ठरल्याचे दिसत आहे. यूपीएससी ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वात उच्च स्थानाची परीक्षा आहे. यातून आयएएस, आयपीएस यांसारखी मोठी पदे भरली जातात. या परीक्षेमध्येच घोटाळा झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर यूपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले होते.