पत्रकारांवर दंडेलशाहीचा वापर करणार्‍यांना जय भगवान महासंघ चोख उत्तर देईल -आनंद लहामगे

पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

अहमदनगर

केडगाव मधील पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा जय भगवान महासंघाच्या वतीने निषेध व्यक्त करुन, या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून, कठोर कारवाई करण्याची मागणी जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी केली आहे.

मुरलीधर तांबडे एका दैनिकाचे उपसंपादक असून, त्यांच्या कुटुंबियांना मारहाण झाली आहे. केडगाव येथे राहत्या घरी असताना काही किरकोळ कारणावरून सदर भागातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पत्रकार तांबडे व त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. गुन्हा दाखल होऊन देखील आरोपी अद्यापि फरार आहेत. कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर, पत्रकार, आरोग्य कर्मचारी व समाजसेवक स्वत:चे जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. त्यांच्यावर दडपशाही करुन हल्ले करणे हे कायदा सुव्यवस्थेचा भंग आहे. सामाजिक योगदान देणार्‍या व्यक्तींच्या पाठीमागे जय भगवान महासंघ उभा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करणार्‍या सर्व गुंडांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष लहामगे यांनी केली आहे.

 

हे ही अवश्य पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा :

कोरोना काळात फ्रंन्टलाईन वर्कर म्हणून पत्रकार कर्तव्य बजावत आहे. आपल्या कुटुंबाची पर्वा न करता त्यांचे कार्य सुरु असून, पत्रकार ताबंडे व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. पत्रकारांवर हल्ले होणे निषेधार्ह बाब आहे. सदर प्रकरणी गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना देखील निवेदन पाठविण्यात आले आहे. पत्रकारांवर दंडेलशाहीचा वापर करणार्‍यांना जय भगवान महासंघ चोख उत्तर देईल.  –आनंद लहामगे.