वांबोरीत बिबट्याची दहशत कायम; जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा

अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे बिबट्याची दहशत कायम आहे. शुक्रवारी सायंकाळी जवरे यांच्या घराजवळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. बिबट्या मोकाट असल्याने दररोज रात्री बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. बिबट्या थेट गावात पोहोचल्याचा ‘दिव्य मराठी’ने ग्राउंड रिपोर्ट मांडला. त्यात बिबट्याची दहशत व पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी मांडली होती. वृत्त प्रकाशित होताच वनविभागाचे पथक जवरे वस्तीवर शुक्रवारी दाखल झाले. सीसीटीव्हीत कैद दोन्ही बिबट्याचे चित्रीकरण व परिसरातील माग पाहिल्यानंतर पिंजरा लावण्याचा निर्णय वन विभागाने घेतला. बिबट्या जेरबंद करण्यासाठ पिंजरा लावून त्यात भक्ष्य ठेवले आहे.