सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग; HDFC ची वादग्रस्त जाहिरात

पहिल्या जाहिरातीतील तो उल्लेख टायपिंग मिस्टेक

(वैष्णवी घोडके)

 एचडीएफसी बँकेने प्रसिद्ध केलेलं विक्री अधिकारी भरतीची जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.  यूजर्स बँकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलंय. सोशल मीडियावर ट्रोलिंग झाल्यावर बँकेने त्यांची चूक सुधारली आहे. एचडीएफसी बँक तामिळनाडू शाखेने त्याच्या शाखेत विक्री अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती करण्यासाठी जाहिरात जारी केली होती. असे 2021 मध्ये उत्तीर्ण झालेले पदवीधर विक्री अधिकारी पदासाठी पात्र नाहीत, असा उल्लेख जाहिरातीमध्ये करण्यात आला होता.

एचडीएफसीचं जॉब सर्कुलर जारी झाल्यानंतर बँकेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. जाहिरातीवरुन वाद वाढल्यानंतर बँकेनं पुढे येत घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागून स्पष्टीकरण दिले. बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले ती टायपो एरर असल्याचं सांगितलं. प्रवक्त्यानं घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असं स्पष्टीकरण दिलं. वयाची अट पूर्ण करणारे कोणत्याही वर्षी उत्तीरण झालेले पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात, अशी माहिती एचडीएफसीच्या प्रवक्त्यानं दिली.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

दुसरी जाहिरात जारी

2021 बॅचच्या विद्यार्थ्यांना अर्जासाठी अपात्र घोषित करणारी जाहिरात व्हायरल झाल्यानंतर बँकेला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावरील ट्रोलिंगनंतर बँकेने दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली. पहिल्या जाहिरातीतील तो उल्लेख टायपिंग मिस्टेक असल्याचं म्हटलं. .

 

 एचडीएफसी बँकेने या रिक्त पदासाठी जारी केलेल्या पहिल्या जाहिरातीमधील चूक सुधारली. दुसऱ्या जाहिरातीमध्ये विक्री अधिकारी पदासाठी 2021 मधील पास विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास पात्र घोषित केले. तामिळनाडूच्या मदुराईमध्ये वॉक-इन मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये 2021 चे पासआऊट विद्यार्थी देखील समाविष्ट होते.