1980 नंतर ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच पदक, भारतीय हॉकी टीमने रचला इतिहास

कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 असा विजय

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 असा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने हॉकीमधला 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं आहे. काहीही करुन आजचा सामना जिंकायचाच, असा निश्चय भारतीय संघाने केला होता.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

त्यानुसार तिसऱ्या क्वार्टरची सुरुवात भारतीय संघाने जबरदस्त केली. सामन्याच्या 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंगने गोल केला. तिथंच भारताला आघाडी मिळाली. लगेचच 5 मिनिटांनी सिमरनजीतने गोल करुन भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने पेनल्टी कॉर्नर मिळवले पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यास जर्मनीला अपयश आलं. सरतेशेवटी कांस्य पदकाच्या सामन्यात भारताने जर्मनीला 5-4 ने पराभूत करुन 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला.