विनेशला मिळणार खाप पंचायत कडून ‘सुवर्णपदक’

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केलेली असून १ रौप्य आणि ५ कास्य पदक भारताला मिळाले आहेत, पण या व्यतिरिक्त पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने विनेशचे सुवर्ण हुकले होते, पण काही हरकत नाही, खाप पंचायत महिला मल्ल विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधील कामगिरीचा गौरव म्हणून स्वतः ‘सुवर्णपदक’ बक्षीस देणार आहे. यासंदर्भात सांगवान खापचे अध्यक्ष सोमबीर सांगवान म्हणाले, ‘ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्यांना मिळालेल्या पदकाप्रमाणे आम्ही सुवर्णपदक बनवू, त्याचे वजन ५० ग्रॅम किंवा १०० ग्रॅम असू शकते. १०० ग्रॅम शारीरिक वजन अधिक असल्याच्या बहाण्याने विनेशला स्पर्धेतून अपात्र ठरविण्याचा प्रकार धक्कादायक आहे. तिच्याविरुद्ध कट रचला गेला यात शंका नाही; पण ऑलिम्पिकमध्ये तीन सामने जिंकून तिने कोट्यवधी लोकांची मने जिंकली आहेत. म्हणूनच प्रत्येक भारतीय तिला सुवर्णपदक विजेत्यापेक्षा अधिक सन्मान देत आहेत.