पोलिओचे 2 टाइप लवकरच जगाच्या नकाशावरून पुसले जाणार!

पोलिओ विषाणू पसरण्यापासून रोखणे अवघड आहे. मात्र हा आजार जागतिक नकाशावरून पुसून जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती एका तज्ज्ञाने गुरुवारी दिली. पोलिओशी प्रभावीपणे मुकाबला करण्यात भारताच्या भूमिकेबद्दल कौतुक आहे, मात्र कोणत्याही निष्काळजीपणामुळे हा आजार पुन्हा येण्याची शक्यता असल्याची भीती संशोधक डॉ. आनंद शंकर बंडोपाध्याय यांनी व्यक्त केली. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनशी संबंधित पोलिओविरोधी टीममधील तंत्रज्ञान, संशोधन आणि विश्लेषण विभागाचे उपसंचालक बंडोपाध्याय यांनी जागतिक पोलिओ दिनानिमित्त पोलिओबद्दल माहिती दिली.

◈ पोलिओचे टाइप १, टाइप २ हे प्रकार संपले.

◆ पोलिओचे टाइप १, टाइप २ आणि टाइप ३ हे तीन सेरोटाइप आहेत. यापैकी टाइप २ आणि टाइप ३ हे प्रकार जगातून संपुष्टात आलेत.
◆ पोलिओ विषाणू टाइप १ प्रामुख्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये आहे. त्यामुळे जागतिक परिस्थितीचा विचार करता आपण पोलिओ निर्मूलनाच्या मार्गावर आहे, असे आपण म्हणू शकतो.

◈ पोलिओ संपेल का?

◆ पोलिओला जगातून कायमचे नष्ट करणे शक्य आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, पोलिओ विषाणू म्हणून मरतोय.
◆ ‘वाइल्ड टाइप’ पोलिओ विषाणू पाक आणि अफगाणिस्तानमध्ये आहे, तर ‘व्हेरिएंट पोलिओ व्हायरस’ आफ्रिकन प्रदेशातील काही देशांमध्ये आहे. याच्या आधारावर, आपण पोलिओला संपवू शकतो.
◆ मात्र आव्हाने संपलेली नाहीत. काही देशांमध्ये सर्व मुलांना लसीकरण करणे कठीण असते. काही देशांमध्ये युद्ध, अशांतता आणि बंडखोरीमुळे पोलिओ लसीकरणाला फटका बसत आहे. ही आजार पूर्णपणे नष्ट करण्यातील मोठी अडचण आहे.