शहर, उपनगरात एक दिवस उशिराने मिळणार पाणी!
अहिल्यानगर : महावितरण कंपनीकडून शनिवारी १९ ऑक्टोबरला शहराच्या पाणी योजनेवर शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरास एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे. मुळानगर, विळद येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार आहे. शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नसल्याने शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरास सकाळी ११ वाजेनंतर पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. या भागात रविवारी पाणीपुरवठा होणार आहे.