“कोण म्हणतं भारतात जातीयवाद पसरलाय? खरी माणुसकी अजून जिवंत आहे…!”
खऱ्या आयुष्यातील काही प्रसंग डोळे उघडणारे असतात!
Share
Breaking Positive News from Beed! “कोण म्हणतं भारतात जातीयवाद पसरलाय? खरी माणुसकी अजून जिवंत आहे…!”
आजकाल सोशल मीडियावर, न्यूज चॅनेलवर आणि राजकीय वर्तुळात सतत एकच चर्चा होते – “भारतामध्ये जातीयवाद, धर्मांधता वाढली आहे”. पण खऱ्या आयुष्यातील काही प्रसंग डोळे उघडणारे असतात!
बीड शहरातून एक अशीच प्रेरणादायी घटना समोर आली आहे, जी सांगते – माणुसकी अजूनही जिवंत आहे आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य हेच आपल्या देशाचं खरं बळ आहे!
घटना काय आहे?
९ सप्टेंबर २०२५ रोजी बीड शहरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रामध्ये पार्वताबाई सोमनाथ माळवे (रा. सिन्नर, जि. नाशिक) यांना दाखल करण्यात आलं. पण विशेष म्हणजे त्यांना या ठिकाणी घेऊन आलेले होते दोन मुस्लिम युवक – सय्यद अली अश्फाक आणि शेख शोएब.
गेल्या ८ दिवसांपासून हे दोन्ही युवक पार्वताबाईंना आपल्या घरात ठेवून, आईप्रमाणे सांभाळ करत होते. त्यांनी त्यांना प्रेम, आदर, अन्न-पाणी दिलं आणि शेवटी आदरपूर्वक जिव्हाळा केंद्रात सोडून आले. इतकंच नाही, निरोप घेताना त्यांनी आजींना काही पैसे , फळं , फरसाण देऊन डोळ्यात पाणी आणलं.
पार्वताबाईंनी स्वतः सांगितलं – “माझ्या चार मुलं आणि दोन मुली आहेत. पण दोन सुनबाईंनी मला घरातून बाहेर काढलं. त्यानंतर मी थेट सय्यद अली यांच्या घरी आले आणि त्यांनी मला आपल्या कुटुंबासोबत आईप्रमाणे सांभाळलं. माझ्यावर त्यांनी मोठे उपकार केले.”
समाजाला संदेश:
या घटनेने स्पष्ट होतं की जातीयवाद, धर्मांधता हे फक्त राजकारण्यांनी निर्माण केलेले विषय आहेत. काही लोक धर्मावरून भांडणं लावतात, पण जमिनीवर अजूनही हिंदू-मुस्लिम ऐक्य हे समाजाचं खरं शस्त्र आहे.
“येतिल बहु, जातील बहु, पण हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे तोपर्यंत देश सुरक्षित आहे.”
यावेळी जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे संचालक अभिजीत वैद्य, व्यवस्थापक राजू वंजारे, काळजीवाहक छायाताई सरोदे यांनीही आजींना सस्नेह स्वीकारलं. तसेच डॉ. संजय तांदळे (अध्यक्ष, मातृभूमी सामाजिक प्रतिष्ठान) आणि धडाडीच्या समाजसेविका मीनाक्षी देवकते यांची विशेष उपस्थिती होती.
सोशल मीडियावर व्हायरल का व्हायला हवं?
आज आपण नकारात्मक बातम्यांनी वेढलो आहोत – भांडणं, राजकारण, द्वेष… पण अशा सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कारण या गोष्टी नव्या पिढीला दाखवतात की रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं मोठं असतं.
म्हणूनच मेट्रो पोर्टलचं आवाहन – “ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून भारतात अजूनही एकतेची भावना जिवंत आहे हे जगाला कळेल!”