नैसर्गिक आपत्ती येण्याआधी प्राणी का अस्वस्थ होतात? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं!
भूकंप, त्सुनामी, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याआधी कुत्रे रडायला लागतात, मांजरी गायब होतात आणि हत्ती थेट उंच भागाकडे पळतात – हे फक्त दंतकथा नाही, तर आता विज्ञानानेही याला दुजोरा दिला आहे!

2004 साली आलेल्या विनाशकारी त्सुनामीवेळी अंदमानमधील हत्ती अपघात घडण्याच्या आधीच उंच डोंगरांवर गेले होते. त्यानंतर वैज्ञानिकांचं लक्ष प्राण्यांच्या या अनोख्या क्षमतेकडे गेलं. लोकांनी आधी हे योगायोग समजले, पण संशोधनानंतर वैज्ञानिकांनी सिद्ध केलं की हे वर्तन निसर्गातील अत्यंत सूक्ष्म बदलांवर आधारित असतं.
भूकंप होण्याआधी पृथ्वीच्या आत प्लेट्समध्ये घर्षण निर्माण होतो. त्यातून अतिसूक्ष्म कंपनं, ध्वनीलहरी किंवा गंध निघतो – जे मानवाला जाणवत नाहीत. पण कुत्र्यांचा श्वासोच्छ्वासाचा वेग, मांजरींची हालचाल, हत्तींचे पाय, पक्ष्यांची उडणारी झुंड – हे सगळं बदलू लागतं. कारण या प्राण्यांना त्या लहरी लगेच जाणवतात.
हत्तींच्या पायांमध्ये एवढी संवेदनशीलता असते की जमिनीतील अगदी सूक्ष्म हलचालीसुद्धा ते ओळखतात! त्यामुळेच ते धोक्यापूर्वीच पळ काढतात. कुत्रे अचानक रडतात, मांजरी लपतात आणि पक्षी वेगाने स्थलांतर करतात.
यावर आधारित जपानसारख्या देशात ‘प्राणी-आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ विकसित केली जात आहे. जिथे कुत्र्यांच्या वर्तनाचे अल्गोरिदम तयार करून संभाव्य भूकंपाची पूर्वसूचना दिली जाऊ शकते.
विज्ञान सांगतं – प्राणी हे निसर्गाच्या चेतावणी संकेतांचा जिवंत अलार्म असतात! त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपणही सजग राहायला हवं.
#AnimalAlert #NaturalDisaster #ScienceFacts #MetroPortal #BhukampWarning #TsunamiSigns #ViralNews #AwarenessPost