महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत!

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. महिला पर्यटक www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन सवलतीचा लाभघेऊ शकतात, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. याशिवाय विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. ‘आई’ महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.