खाकी वर्दीतला आपला माणूस
खादी आणि खाकी यांच्याही खूप पुढे जाणारं हे चारित्र्य आहे. हे आहेत समाजाचे खरे हिरो! हे आहेत औरंगाबादचे विभागीय आयुक्त आयएएस.
हे फोटो बघा. खादी आणि खाकी यांच्याही खूप पुढे जाणारं हे चारित्र्य आहे. हे आहेत समाजाचे खरे हिरो! हे आहेत औरंगाबादचे विभागीय आयुक्त आय
एएस. सुनिल केंद्रेकर– आणि मिसेस केंद्रेकर. औरंगाबादेत भाजी बाजारात खरेदी करतांना. आपल्या कर्तृत्वानं ‘खास’ बनल्यानंतरही ‘आम’ राहण्यातच माणसाची खरी कसोटी लागते . कोणतंही ढोंग न करता साधेपणा कशा पद्धतीने टिकवला जाऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण आहे हे फोटो. माझ्या पाहण्यात हे फोटो आले तेव्हा राहवलं नाही. फोनवरून त्यांची परवानगी घेतली. पुढच्या पिढीत हा साधेपणाचा आणि सच्चेपणाचा आदर्श झिरपावा म्हणूनच हा उद्योग. त्यांनी परवानगी दिली, हे सांगत की यात विशेष काही नाही, हे माझं रूटीन आहे. श्रीमती केंद्रेकर यांचा साधेपणाही लक्षणीय आहे. . महाराष्ट्र नशीबवान आहे. प्रशासनात आजही असे अनेक अधिकारी आहेत ज्यांचं माणूसपण सुटलेलं नाही. जे तरूण मित्र एमपीएससी, आयएएस होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी हे फोटो कायम स्मरणात ठेवावेत. आणि अशाच पद्धतीने खास होऊनही आम राहावे.
