आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत स्त्रीरोग आणि दंतरोग तपासणी शिबिर

नगर: आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत स्त्रीरोग, गर्भवती महिला तपासणी आणि दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जून रोजी स्त्रीरोग, गर्भवती महिला तपासणी तर 24 जून रोजी नंतर दंतरोग तपासणी शिबिर होणार आहे. शिबिराची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 अशी राहील. या शिबिरात तज्ञ डॉक्टर, रुग्ण तपासणी करून उपचार व मार्गदर्शन करणार आहेत. स्त्रीरोग व गर्भवती महिलांना तपासून शिबिरामध्ये गर्भवती महिलांच्या गरोदरपणातील पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. आहार तज्ञांद्वारे आई आणि बाळाच्या पोषणासाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या गर्भवती मातांना सोनोग्राफी, रक्त, लघवी इ. तपासणीवर 50% सवल दिली जाणार आहे. तसेच नॉर्मल व सिझर डिलेव्हरी सवलतीच्या दरात केली जाणार आहे. या शिबिरासाठी डॉ. रवींद्र मुथा आणि डॉ. सोनल बोरुडे रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत.