
अहिल्यानगर, ता. 22
प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, भैय्या चव्हाण, किसन कसबे, किसन नांगरे, अनेक नागरिक आणि महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
संपत बारस्कर यांचे आवाहन:
घंटागाडी दररोज येत नसली तरी दोन दिवस कचरा साठवून ठेवा.
आमच्याशी संपर्क करा — आम्ही कचरा उचलण्याचे नियोजन करू.
रस्त्यावर कचरा टाकू नका.
स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हा.
आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास आरोग्य सुदृढ राहते.
“स्वच्छ, सुंदर, हरित प्रभाग हा आपला उद्देश आहे. रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी, ओपन स्पेस सुशोभीकरण, वृक्षारोपण या सर्व विकासकामांना गती दिली आहे.” — संपत बारस्कर
डॉ. सागर बोरुडे यांचे मत:
प्लास्टिकचा वापर टाळा — प्लास्टिक पिशव्यांमुळे दुर्गंधी व पर्यावरणाचे नुकसान होते.
कापडी पिशव्यांचा वापर वाढवा.
नागरिकांचे मत:
पूर्वी प्रभागात रस्ते नसल्यामुळे स्वच्छता कर्मचारी येत नव्हते, आता विकासकामांना गती मिळाली आहे. या कामात आमदार संग्राम जगताप यांचे मोलाचे सहकार्य आहे.
नागरिकांनी विकासाबाबत आपले मत नक्की कळवावे असे आवाहन बारस्कर यांनी यावेळी केले