कॉटेज कॉर्नर परिसरात “जळीतकांड” , महाठग किरण महंत चा नवा गेम प्लॅन
कॉटेज कॉर्नर परिसरात "जळीतकांड" , महाठग किरण महंत चा नवा गेम प्लॅन
नगरमधील मोठ्या घरातील महिलांना शेअर बाजारात पैसे गुंतवतो असे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणारा किरण महंत आता या तगादा करणाऱ्या महिलांच्या जीवावर उठला आहे. शनिवारी तर त्याने कहरच केला. या महिलांचे पैसे परत देऊपर्यंत त्याच्या राहत्या घराचा ताबा त्याने तक्ररदार महिलांना दिला होता. हे घरच त्याने बाहेरून पेटवून दिले. आणि आत राहणाऱ्या लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या बाबत नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा भरतीय दंडविधान कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या महिला करत आहेत. तसेच या महिलांना न्याय मिळवून देऊन आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी नाहीतर ज्या महिलांची फावणूक झाली आहे. त्यांच्याच जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या ठिकाणी पोलीस काहीच करत नसल्याने या महिला हवालदिल झाल्या आहेत. हे जळीतकांड किरण महंत याने रात्री पावणे दोन च्या सुमारास घडवून आणले. कॉटेज कॉर्नर , डॉन बास्को कॉलनीजवळ , श्रीराम नगरात हे घर आहे. तिथे तो स्वतः आला आणि पेट्रोल टाकून बंगल्यात राहत असलेले संजय प्रभुणे यांची रिक्षा, मोटरसायकल आणि कंपाउंड मध्ये ठेवलेले सामान त्याने पेटवून दिले. या बंगल्यात त्यावेळी प्रभुणे यांची पत्नी प्रभुणे दोन मुले आणि मुलगी होते. ही आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने बंगल्याच्या काचा तडकल्या. आणि धुराचे लोट बंगल्यात शिरले. त्यामुळे बंगल्यात राहणाऱ्या लोकांचा जीव गुदमरला. त्यांनी आरडाओरड करून आसपासच्या लोकांना बोलवले . तोपर्यंत किरण महंत याने बंगल्याला बाहेरून कुलुपे लावली होती. त्यामुळे त्यांना दरवाजा उघडून बाहेर येता येत नव्हते. त्यानंतर लोकांनी आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना गोळा केले. रहिवाशांनी पहारीच्या सहाय्य्यने घराला लावलेल्या लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडला आणि आतील लोकांना बाहेर काढले. या घटनेमुळे प्रभुणे कुटुंबीय प्रचंड दहशत नई तणावाखाली वावरत आहे. फूस लाऊन लोकांचे पैसे घेऊन त्यांना फसवून पैसे परत देण्याची कमिटमेंट करून पैसे परत न देता अशा प्रकारे लिकांच्या जीवावर उठणाऱ्या नराधमाचा बंदोबस्त करावा . नाहीतर अशा अपप्रवृत्तींना आळा बसणार नाही. आणि काळ सोकावल्या शिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होतेय.