बाजार समिती च्या निवडणुकीत कायदेशीर पेच

जानेवारीत मतदान : जिल्ह्यात ५५० सेवा संस्थांचा कार्यकाळ संपला , तरीही मतदानाला पात्र

जिल्ह्यातील साडे पाचशेहून अधिक सेवा संस्थांच्या निवडणूका रखडलेल्या असताना बारा बाजार समित्यांचा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे . जिल्हा उपनिबंधकांनी जानेवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार याद्या मागवल्या आहेत . त्यामुळे जुन्याचं संचालक मंडळांना मतदानाचा अधिकार प्राप्त होणार असून , यामुळे कायदेशीर पेच उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . नगर जिल्ह्यातील नगर आणि श्रीगोंदा वगळता सर्वच बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपून एक वर्ष झाले आहे .  त्यामुळे जानेकारित होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा उपनिबंधक  दिग्वजय आहेर यांनी मतदार याद्या मागविल्या आहेत . समितीच्या सर्व सभापती व सचिव यांची त्यासाठी नुकतीच आढावा बैठक आहेर यांनी बोलावली होती