कोतवाली पोलिसांनी पकडला कोटीचा गुटखा ; १० जण अटक
अहमदनगर – गुटख्याच्या गोडावूनवर कोतवाली पोलीसांचा छापा टाकून १० आरोपींना अटक करून १ कोटी ६ लाख २३ हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पञकार परिषदेत दिली. यावेळी कोतवाली पोलिस ठाण्याचे पो नि संपत शिंदे हे उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पो नि संपतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार पोसई गजेंद्र इंगळे, व गुन्हे शोध पथकाचे पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोना सागर पालवे, पोना राजु शेख, पोकाँ अभय कदम, पोका दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकों सोमनाथ राउत, पोकाँ अतुल काजळे तसेच पोहेकाॅ दिपक सावळे, चापोहेकाॅ सतिष भांड, पोना राहुल गवळी, पोकाॅ संदीप थोरात, पोकाॅ राहुल गुंडू ( सायबर सेल अ नगर) आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
दि.१६ फेब्रुवारी २०२२ रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात दोनजण महाराष्ट्र राज्यात गुटखा सुगंधीत सुपारी विक्री करणे व त्याचा साठा करून सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ कब्जात बाळगण्यास प्रतिबंध असताना एका मोपेड गाडीवरुन गुटखा व सुगंधीत सुपारीजन्य पदार्थ सोबत घेऊन ते विक्री करण्यास आलेले आहेत. आता गेल्यास मिळून येतील अशी बातमी मिळाली. त्या ठिकाणी जावून खात्री करून छापा टाका, असा आदेश दिल्याने पोसई गजेंद्र इंगळे व गुन्हे शोध पथकाला पोनि.श्री शिंदे यांनी दिला.
पथकाने त्या ठिकाणी जावून खात्री करून पंचासमक्ष छापा टाकला असता त्यांचे कडील गोवा गुटखा, सुगंधीत सुपारी विक्री करताना मिळून आले. त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव राकेशकुमारा जगदंबप्रसाद मिश्रा (वय ४२, रा MIDC अ.नगर), अभिजित गोवींद लाटे (वय ३४ रा पाईपलाईन रोड अ नगर) असे असल्याचे सांगितले. त्यांना त्यांचे ताब्यातील गोवा गुटख्याबाबत चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी येथे गुटख्याचे गोडावून असून तेथूनच सगळा माल विक्री करीता वितरीत केला जातो, असे सांगितले.
पोलीस पथकाने एमआयडीसी बोल्हेगाव परिसरात राहणारे रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे यांचे शेती गट क्रं ६५/५ गटमध्ये एका पत्र्याचे शेडमध्ये पंचासमक्ष छापा टाकला. या ठिकाणी आरोपी हे गुटख्याचे पाकीट मोजताना मिळून आल्याने त्यांना जागीच ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव राहुल कैलासनाथ सिंग (वय २४, रा दसगर पारा ता कादीपुर जि सुलतानपुर उत्तर प्रदेश ह.रा. MIDC बोल्हेगाव अ नगर), अझर शकील शेख वय ३१ रा दावल मालीक चौक बोल्हेगाव ता जि अहमदनगर), चंद्रकेश शोभनाथ तिवारी (वय ५०, रा पाडीच डिहीया ता शाहगंज जि जोनपुर उत्तर प्रदेश ह.रा. MIDC बोल्हेगाव अ नगर), शिवप्रकाश रामकुमार तिवारी (वय ४८, रा रामडिहीया ता शहागमज जानेपुर उत्तर प्रदेश ह.रा. एमआयडीसी बोल्हेगाव अ नगर), मोहसिन शब्बीर पटेल (वय ३६ रा बोल्हेगाव नवनाथ नगर ता जि अहमदनगर), अर्जुन शंकर यादव (वय ४६, वरळी कोळी वाडा वारसलेन मुंबई ह.रा एमआयडीसी बोल्हेगाव अ नगर), नितीन सुनिल साठे (वय ३२, रा सनफार्मा शाळे जवळ बोल्हेगाव अहमदनगर), शादाब शब्बीर पटेल (वय २९, रा बोल्हेगाव नवनाथ नगर ता जि अ नगर) अटक असून, पत्र्याचे गोडावून, शेडचे मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे हा फरार असल्याचे सांगितल्याने त्या ठिकाणाची पंचासमक्ष झडती घेतली. गुटखा व सुगंधीत सुपारी व माल वाहतूक करणे करीता वापरातील वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे .