घेवडा,अद्रक, पालेभाज्यांचे दर टिकून

तर कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

एकीकडे इंधनासह बियाणे खते व मजुरांचे दर प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला उत्पादनासह वाहतुकीचा खर्च वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतातून तर बाजार समितीमध्ये दुप्पट दराने वाहतूक खर्च करावा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही तर दुसरीकडे व्यापारी भाजीपाल्यांचे दर वाढ होऊन देत असल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. उन्हाळा संपत आल्यामुळे महिला वर्गात वाळवणाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू आहे वाळवणाचे विविध पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या बटाट्याला गेल्या काही दिवसापासून सातत्याने मागणी वाढत आहे. तर दुसरीकडे कांद्याने मात्र शेतकऱ्यांना डोळ्यात पाणी आणले आहे. मोठा खर्च करून लहान मुलासारखी काळजी घेतलेल्या कांदा ऐन काढणीस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान झाले. मात्र निसर्गापुढे हतबल होण्यापलीकडे शेतकरी काहीच करू शकला नाही पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला तर उरलेला कांदा हाती असलेले सर्व पैसे खर्च करून चाळीत कांदा भरला मात्र चाळी ठेवलेला कांदा देखील खराब होत असल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे. जून महिना सुरू झाला आहे मात्र अद्यापही उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे हिरव्या पालेभाज्यांच्या उत्पन्नात घट निर्माण झाली आहे उत्पन्न कमी व मागणी अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे मेथी कोथिंबीर आणि पालक आता 25 ते 30 रुपयांना जोडी मिळत आहे.