धर्मांतरविरोधात कडक कायद्याची मागणी

अहिल्यानगरात जनआक्रोश मोर्चा — संग्राम जगताप यांचा पुढाकार

🚩
 धर्मांतरविरोधात कडक कायद्याची मागणी
अहिल्यानगरात जनआक्रोश मोर्चा — संग्राम जगताप यांचा पुढाकार

📌 अहिल्यानगर, ता. 22
देशभरात आणि परदेशात हिंदू धर्माचे बळजबरीने धर्मांतर केल्या जात असल्यामुळे हिंदू समाज असुरक्षित होत चालला आहे. त्यामुळे धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात फक्त मोर्चे निघून उपयोग नाही; तर प्रत्येकाने जागरूक राहून धर्मांतर रोखण्यासाठी पुढे यावे आणि जिल्हा व राज्यात धर्मांतरविरोधी कडक कायदा लागू करावा, अशी ठाम मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

🔥 जनआक्रोश मोर्चाची माहिती
⏩ रविवारी (ता. 22) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (अहिल्यानगर) येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (मार्केट यार्ड चौक) पर्यंत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
⏩ मोर्चानंतर झालेल्या सभेत आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, हिंदुत्ववादी कार्यकर्त्या वर्षा डहाळे आणि आदिनाथ पालवे महाराज यांची भाषणे झाली.

🗣 संग्राम जगताप यांचे प्रतिपादन
👉 हिंदू धर्माने कधीच बळजबरीने धर्मांतर केले नाही.
👉 सांगली जिल्ह्यातील ऋतुजा राजगे यांचे प्रकरण हा धर्मांतराचा भयावह परिणाम आहे.
👉 प्रत्येक हिंदूने जागरूक राहून धर्मांतरविरोधात आवाज उठवला पाहिजे.

🗣 गोपीचंद पडळकर यांचे विचार
👉 नगर जिल्ह्यात सर्वाधिक हिंदूंचे धर्मांतर होत असल्याचा आरोप
👉 जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करावी आणि गरज पडल्यास बुलडोझर चालवावा.
👉 आरक्षणासाठी खोटे दाखले देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे.

 

👥 उपस्थित मान्यवर:
➡️ आमदार संग्राम जगताप
➡️ आमदार गोपीचंद पडळकर
➡️ वर्षा डहाळे (हिंदुत्ववादी कार्यकर्ते)
➡️ आदिनाथ पालवे महाराज