निंबळक बायपासवर गळा चिरून झालेल्या हत्येतील आरोपींची निर्दोष मुक्तता
नगर तालुक्यातील निंबळक बायपास रोडवर पैश्याच्या देवाण-घेवाण मधून एकाची गळा चिरुन झालेल्या हत्येमधील आरोपीची निर्दोष मुक्तता झाली असल्याची माहिती अॅड. परिमल फळे यांनी दिली.
11 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9 च्या सुमारास लामखडे पेट्रोल पंप जवळ रामदास बन्सी पंडित यांचे प्रेत आढळून आले होते. त्यांची गळ्यावर चाकूने सुमारे 13 वार करून निर्घृण हत्या केल्याचे आढळले. मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला. पोलिसांनी केलेल्या तपासात विशाल माणिक घायमुक्ते यांनी सदरची निर्घुन हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. हत्ये मागचे कारण हे पैशाची देवघेवण असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी विशाल घायमुक्ते याच्याकडून त्याचे रक्ताने माखलेले कपडे व रक्ताने भरलेला चाकू पोलिसांना तपास कामी हस्तगत केला होता. तपासाअंती पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र अहमदनगर न्यायालयात दाखल केले होते. सदर खून खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. यार्लगड्डा यांच्यासमोर झाली. आरोपींच्या वतीने अॅड. परिमल फळे यांनी साक्षीदारांची उलटतपासणी व युक्तिवाद केला. अॅड. परिमल फळे यांनी घेतलेला उलट तपास व युक्तिवाद ग्राह्य पकडून आरोपी यास न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. सदर खटल्याच्या सुनावणी कामी अॅड. फळे यांना अॅड. सागर गायकवाड, अॅड. अभिनव पालवे व अॅड. प्राजक्ता आचार्य यांनी सहाय्य केले.