पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीची सत्ता आ. निलेश लंके यांचे वर्चस्व
अहमदनगर:मेट्रो न्यूज
अहमदनगर पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. आ.निलेश लंके आणि आ.विजयराव औटी एकत्र आल्याने 18 पैकी 18 जागा निवडून आणण्यात आमदारांना यश आले आहे. या निवडणुकीकडे आ.निलेश लंके विरुद्ध खा. सुजय विखे असं पाहिलं जात होतं… त्यात लंके यांनी बाजी मारली.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 18 जागांवर आमदारांनी एक हाती सत्ता आणली आहे. 18 च्या 18 उमेदवार निवडून आल्याने निवडून आलेल्या आमदारांची पारनेर शहरातून मिरवणूक करण्यात आली . नंतर मिरवणुकी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सभेत रूपांतर झालं.
या निवडणुकीत खा. सुजय विखे यांनी भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता आणि आपली ताकद लावली होती, यावर राजकीय वैर असलेले आ. विजय औटी यांच्यासोबत आ.निलेश लंके यांनी हात मिळवणे केली होती, यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सत्ता आणण्यात लंके यांना यश आले आहे.
आम्ही जनतेचे काम करतो… कुणाची हवा वगैरे काही चालत नाही… स्वाभिमानी पारनेर करणे दिलेले आहे… हा विजय त्यांचाच असल्याचे मत आ. निलेश लंके यांनी व्यक्त केलं.