नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा भाजपचे एकहाती वर्चस्व..

अहमदनगर: मेट्रो न्यूज

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते, नगर तालुका महाविकास आघाडीने या निवडणूकीत मोठी रंगत आणली होती, निलेश लंके व प्राजक्त तनपुरे या दोन विद्यमान आमदारांचे पाठबळ घेऊन आघाडी सुसाट सुटली होती आणि विजयी आम्हीच होणार असा दावा केला होता , पण आज अखेर नगर बाजार समितीचा निकाल लागला आणि भाजपा कर्डिले गटाने आघाडी घेत नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम आहे याची प्रचिती करुन दिली.

 

 

नगर बाजार समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन आघाडीने जोरदार प्रचार केला. नगर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे शिलेदार निवडणुकीत उभे करुन रंगत आणण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न भाजपने वेळीच हाणून पाडला. खा.डॉ. सुजय विखे यांनी कर्डिले यांना मोठी साथ दिली आणि भाजपचे बाजार समिती वरील सलग चौथ्यांदा वर्चस्व सिद्ध झाले.

ठाकरे सेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आ. प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके यांनी आपापल्या गटातील उमेदवार पॅनलमध्ये उभे केले होते त्यापैकी काही मोजक्या उमेदवारांचा विजय होईल असे वाटत असताना देखील कर्डीलेंची मतदारांची सहल मोठी चर्चेचा विषय ठरली,आपल्या गटातील मतदारांना सहल वारी करून आणावी ही भाजपची मानसिकता आघाडीवर पराभवाचे शल्य टाकून गेल्याने नगर तालुका महाविकास आघाडीचे बाजार समितीतील आगामी रणकंदन संपुष्टात आले आहे….

बाजार समितीच्या १६ जागेवर भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. भाजपच्या दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. भाजपच्या विजयाने आघाडीच्या गोटात काही काळ सन्नाटा पसरला होता,आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप पूर्णपणे आघाडीच्या विरोधात आपली ताकद पणाला लावणार आहे , गेल्या १५ वर्षापासून आघाडीचे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर असणारे वर्चस्व भाजप मोडीत काढणार का ! पुन्हा आघाडीच बाजी मारणार या चर्चा आता सुरु झाली आहे, भाजपच्या या एकहाती विजयाने गावागावात कार्यकर्ते उत्साहात आहेत,सर्व नवनियुक्त संचालकांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व खासदार डॉ. सुजय विखे आमदार बबनराव पाचपुते यांनी अभिनंदन केले आहे…