महावितरण मधिल सेवानिवृत्त झालेले भास्करराव खांदवे यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त रिमांड होम येथील विद्यार्थ्यांना शाळेचे साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद – आमदार संग्राम जगताप.
महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असुन सेवानिवृत्त झालेले भास्करराव खांदवे यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत कुठल्याही प्रकारचा खर्च न करता रिमांड होम येथील विद्यार्थ्यांना शाळेची बॅग व साहित्य आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले रिमांड होम येथील शिक्षक भालेराव सर यांना साहित्य देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक संभाजी पवार, विनोद (पिंटू) कटारिया, राष्ट्रवादी युवक चे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, गणेश आनंदकर, रघुनाथ वायकर, हरीश लसगरे, अजिंक्य खांदवे, रियाज शेख, आनंद बडे, सोनू देविकर आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की महावितरण मधिल सेवानिवृत्त झालेले भास्करराव खांदवे यांनी आपल्या कार्यकाळ मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले कार्य केले असून आज त्यांच्या 89 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जे कोरोणाचे देशावर आलेले संकट आहे त्यामुळे वाढदिवस साजरे करणे चुकीचे असून संकटात असलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्याची वेळ असल्याचे त्यांनी सांगून हा उपक्रम घेतला असल्याची माहिती दिली व या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
