BREAKING | चोरट्यांचा अघोषित टूर: चोरीच्या दुचाकीवरून फिरले, टेलरच्या दुकानातून 2.5 लाख लंपास!
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज नेटवर्क
चितळे रोडवर सोमवारी पहाटे 4.30 वाजता चोरट्यांनी अक्षरशः उधळण केली! चोरीच्या दुचाकीवरून फिरणाऱ्या तिघांनी एका टेलरचे दुकान फोडले आणि बिनधास्तपणे ₹2.5 लाखांची रोकड उडवली!
दुकान बंद – चोरांची संधी!
दुकानदार लक्ष्मण दुलम यांनी रात्री 9 वाजता दुकान बंद केलं. पहाटे फोन आला – “दुकान फोडलं गेलंय!”
चोरीचं वाहन, चोरीची फिरकी!
माळीवाडा परिसरातून रात्री 2 वाजता मोटरसायकल चोरून चोरट्यांनी त्यांच्या “मिशन”ला सुरुवात केली.
हॉटेल फोडायचा प्रयत्न फसला
दुकान फोडल्यानंतर चोरट्यांनी लगेच पुढचं लक्ष्य केलं – शेजारचं हॉटेल! दरवाजा उघडला पण कॅशरूमचा सेंट्रल लॉक बळकट ठरला.
गॅरेजही सुटलं नाही!
यानंतर सर्जेपुरा येथील गॅरेज फोडायचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही.
सीसीटीव्हीत चोरटे कैद!
पूर्ण चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून, कोतवाली पोलीस तपासात व्यस्त आहेत.
लोकांना झोप, चोरांना “फ्री-हँड!”
चितळे रोडवरील पोलिस चौकी बंद आहे आणि चोरी टेलरच्या दुकानात थेट 50 फुटांवर घडली. व्यापाऱ्यांचा संताप – “चौकी सुरू असती, तर हे शक्यच नव्हतं!”
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण!
सावेडी, तारकपूर आणि बसस्थानक परिसरात साखळीचोरी, घरफोडीच्या घटनांनी नागरिक हादरलेत.
मेट्रो न्यूजचा सवाल –
“शहराच्या मध्यवस्तीत असा कायदा-सुव्यवस्थेचा खेळखंडोबा का?”
#AklthanagarTheft #ChitaleRoad #CCTVFootage #MetroNewsAlert #CityCrimeWatch #PoliceWhereAreYou #LockYourShops

सीसीटीव्हीत चोरटे कैद!
लोकांना झोप, चोरांना “फ्री-हँड!”
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण!
मेट्रो न्यूजचा सवाल –