अज्ञात चोरट्यांची धाडसी चोरी

राहुरी —- तालूक्यातील ब्राम्हणगाव भांड येथील रमेश वारूळे यांच्या घरात दिनांक २ फेब्रूवारी रोजी अज्ञात भामट्यांनी धाडसी चोरी केली.  भामट्यांनी रोख रक्कमेसह सुमारे चार लाख रूपयांचे सोन्याचे दागीने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

 
दिनांक २ फेब्रूवारी रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथील रमेश नानासाहेब वारूळे यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात भामट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर भामट्यांनी घरातील कपाट व इतर सामानाची उचका पाचक केली. दरम्यान ३ लाख ७९ हजार रूपयांचे सोन्याचे दागीने व १८ हजार ३०० रूपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९७ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळून नेला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच रमेश वारूळे यांनी राहुरी पोलिसांना खबर दिली.
 
यावेळी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उप निरीक्षक निरज बोकील, हवालदार प्रभाकर शिरसाठ, अमोल पडोळे, माळी आदि पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रमेश नानासाहेब वारूळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक भागचंद सुर्यवंशी हे करीत आहेत. या घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.