अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित

पारनेर : सुपर मार्केट , किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री चा निर्णयाबाबत  जनतेकडून हरकती मागविणार  , किराणा दुकानात वाइन विक्री होणार नाही  असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिले , त्यामुळे राळेगण सिद्धी ग्रामसभेच्या   विनंति नंतर आंदोलन स्थगित करण्याचा निंर्णय जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे.
रविवारी सकाळी राळेगण सिद्धी येथे हजारे यांचा उपस्थितीत ग्रामसभा झाली , यावेळी ग्रामस्थांनी राज्य सरकारने आश्वासन दिले  असल्याने  अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित  करावे अशी मागणी केली , त्यावेळी हजारे म्हणाले  कि राज्य मंत्रिमंडळाने जनतेला न विचारता निर्णय घेतल्यामुळे ३ फेब्रुवारी २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाईन विक्रीच्या नवीन धोरणाला विरोध केला . त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एक पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला . दोन्ही पत्रांना सरकारकडून उत्तर न आल्याने ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांना तिसरे पत्र पाठवले . या पत्राद्वारे १४ फेब्रुवारी २०२२ पासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाचा इशारा देण्यात आला होता . मात्र आता राज्य सरकारने आश्वासन दिले . त्यामुळे आंदोलन स्थगित केल्याचे अण्णा हजारे यांनी  सांगितले .