‘ ओकीनोव्हा ‘ ई-बाईक आता नगरमध्ये उपलब्ध

'अरहत ग्रीन व्हील्स ' चे गुरुवारी होणार लोकार्पण

पर्यावरण संतुलीत आणि आर्थिक बचतीच्या सुवर्णमध्य साधणारी भारतीय बनावटीची ‘ओकीनोव्हा’ कंपनीची इलेक्ट्रीक बाईक/ स्कुटर आता नगरमध्ये उपलब्ध होणार आहे. या कंपनीचे नगर जिल्ह्यासाठी वितरक म्हणून ‘अरहत ग्रीन व्हील्स’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या या नवीन शोरुमचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता आ. अरुण जगताप ( विधान परिषद सदस्य ) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे आ. संग्रामभैय्या जगताप, आ.निलेश लंके, उपमहापौर गणेश भोसले यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती ‘अरहत ग्रीन व्हील्स’च्या संचालिका सौ. समृद्धी कटारिया यांनी दिली.
इंधनाच्या अतिवापरामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला असताना वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने इलेक्ट्रीक वाहने बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून ‘ओकीनोव्हा’ कंपनीने आपली दुचाकी वाहने बाजारात आणली आहेत. संपूर्ण भारतीय बनावट असणाऱ्या या ई- बाईकला मोठी मागणी आहे. ‘ओकीनोव्हा’ या कंपनीच्या दुचाकीची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर दुचाकी 60  ते 140 किलो मिटर अंतर जाऊ शकणारी सहा मॉडेल बाजारात उपलब्ध असणार आहेत. यातून प्रती किलो मिटर साधारणपणे 13 पैसे इतका अत्यल्प खर्च यातून येणार आहे.
‘ओकीनोव्हा’ या कंपनीने डिसेंबर 2O21 मध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. एवीएस ब्रेक, ऍलाय व्हील, व आकर्षक रंग संगती आदी वैशिष्टये या वाहनांमध्ये असणार आहेत. वेगवेगळ्या रंगात आणि रंगसंगतीमध्ये ही वाहने तयार करण्यात आली असल्याची माहिती संचालक अनमोल कटारिया यांनी दिली.
‘ओकीनोव्हा’ कंपनीच्या या दुचाकीवाहनामध्ये अद्यायवत अशी ट्रेकींग सिस्टीम देण्यात आली असून त्यासाठी मोबाईलचे ॲप ग्राहकांना दिले जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला त्याची दुचाकी कोठे आहे, तीने आज कोठे प्रवास केला आणि किती प्रवास केला याची माहिती एका क्लीकवर घरबसल्या मिळणार आहे. याशिवाय वाहन चोरी जाण्याचा धोका देखील यात असणार नाही. याशिवाय दुचाकीमधील बॅटरी किती चार्ज आहे आणि त्यातून ही दुचाकी किती किलोमिटर जाऊ शकेल याची माहितीही स्क्रीनवर मिळणार आहे.
‘ओकीनोव्हा’ कंपनीच्या सर्व मॉडेलमधील दुचाकी वाहने ‘अरहत ग्रीन व्हील्स’, फ्लाय ओव्हर पीलर नं. 9. जावा शोरुम समोर, स्टेशन रोड, अहमदनगर या शोरुममध्ये उपलब्ध झाली आहेत. वाहनाच्या मोफत टेस्ट ड्राईव्हसाठी ‘अरहत ग्रीन व्हील्स’ या शोरुमला भेट देण्याचे आणि प्रदूषण न करणाऱ्या ‘ओकीनोव्हा’ या कंपनीच्या वाहनांना पसंती देण्याचे आवाहन संचालिका सौ. समृद्धी कटारिया आणि संचालक अनमोल कटारिया यांनी केले आहे.