अवकाळी पावसाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी- माजी आमदार वैभवराव पिचड

भाजपचे तहसिलदार यांना निवेदन

 गेल्या दोन तीन दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या अकोले तालुक्यातील सर्वच भागातील भात व शेती पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला.
 अकोले तालुक्यात आदिवासी भागासह सर्वच भागात गेली दोन ते तीन दिवसाासून तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे या अवकाळी पावसाने तालुक्यात सर्वत्र भागात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे व भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.आदिवासी भागात मुख्य पीक असलेले भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.इतर भागात कांदा पीक, टोमॅटो, गहू हरभरा , मका , या सहित आदी पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेती मालाला भाव नाही त्यामुळे सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. असे असताना तालुक्याचे लोक प्रतिनिधी झोपले की झोपेचे सोंग घेतात.प्रशासन ही सुस्त झाले आहे अशी टीका श्री पिचड यांनी केली. सध्या भात कापणीचा हंगाम सुरू आहे मोठ्या प्रमाणात या आदिवासी दुर्गम भागात भात कापणी सुरू आहे मात्र अकोले तालुक्यासह वरच्या आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतातील कापलेली भाते तसेच शेतात उभे असलेली भात पिके पूर्ण पणे वाया गेली आहे. अवकाळी पाऊस झाल्या झाल्या तातडीने या पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे होणे गरजेचे होते. ते न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय वीज वितरण कंपनीने वीज बिले सक्तीने वसुली चालू केली आहे.तसेच वीज पुरवठा वेळी यावेळी दिला जात आहे.वीज पुरवठा खंडित केला जात आहे.डीपी चे कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे अजून शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी ने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली. तसेच  नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत न मिळाल्यास  व  शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे न थांबविल्यास मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या प्रसंगी तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या वतीने  भाजपच्या नेते व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले.
              यावेळी जि. प.सदस्य कैलासराव वाकचौरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, जेष्ट नेते शिवाजी धुमाळ, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सभापती उर्मिला राऊत, जि. प माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, ऍड वसंत मनकर, यशवंतराव आभाळे, युवामोर्चा तालुका अध्यक्ष राहुल देशमुख, तालुका सरचिटणीस मच्छीन्द्र मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे, राजेंद्र देशमुख, अरुण शेळके, राजेंद्र गवांदे, लता देशमुख, सौ कल्पनाताई सुरपुरीया, सीताबाई गोंदके, माधवी जगधने, अर्जुन गावडे, अशोक आवारी, राधाकृष्ण पोखरकर, अशोक देशमुख,शंभू नेहे, केशव बोडके, शिवाजी पारासुर, अमोल येवले, अमोल घुले आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.