अहमदनगर जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय निवड कबड्डी स्पर्धेचे उदघाटन .

जिल्ह्यातून ५ खेळाडूंची होणार निवड .

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित खेलो इंडिया राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व निवड चाचणी  सन  २०२१-२२ चा उदघाटन अहमदनगर जिल्हा क्रीडा संकुल येथे आज पार पडले . स्पर्धेचे उदघाटन कोतवाली पोलीस स्टेशन चे पी आय  रवींद्र पिंगळे, प्रकाश मोहारे डी एस ओ ,सुनील जाधव  छत्रपती पुरासकर विजेते ,ज्ञानेश्वर खुरांगे राज्यस्तरीय क्रीडा मार्गदर्शक यांचा हस्ते करण्यात आले . हि निवड चाचणी स्पर्धा दोन दिवस २३/२४ नोव्हेंबर या  कालावधीत होणार आहे ,स्पर्धेचा उदघाटन प्रसंगी खेळाडूंना शपथ देण्यात आली .
या स्पर्धेमधून विजयी होणार संघ व निवड चाचणी मधून निवड होणाऱ्या पाच खेळाडूं अहमदनगर जिल्हाचे प्रतिनिधित्व क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र्र राज्य पुणे विभागात होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेत करणार आहे . महाराट्र राज्यात होणाऱ्या स्पर्धा १४ ते १६ डिसेंबर या कालावधी मध्ये  होणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा कूट भाळवणी बालेवाडी येथे होणार आहे. या स्पर्धेमध्ये अहमदनगर मधील सर्व तालुक्यातील किमान २०संघाने सहभाग नोंदवला आहे . असे प्रतिपादन राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांनी केले . यावेळी विजय सिंह मिस्कीन ,बाळासाहेब कडूस ,बळीराम सातपुते ,शंतनू पांडव ,शिवाजी वाक्बाल, गीताराम पवार ,विजय जठार ,देविदास अंगरख ,विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते