प्रो फिटनेस हेल्दी लाईफस्टाईल फिटनेस हेल्थ क्लब नगरकरांचे आरोग्य सुदृढ आनंदित ठेवेल: माजी उपमहापौर अनिल बोरुडे

आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात विस्कळीत जीवन शैली मुळे  माणसाला आजार जडतात. नियमित वॉकिंग, जॉगिंग आणि व्यायाम करूनही फास्ट फूड, जंक फूडच्या अघोरी सेवनामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. निरोगी जीवनासाठी कसे रहावे, काय खावे, कसे जगावे, कशात आनंद शोधावा हेच त्यांना काळात नाही. श्रीमती शैला भोसले, ज्योती संभार यांनी हेल्दी  लाईफ जगण्यासाठी हेल्दि लाईफस्टाईल फिटनेस हेल्थ क्लब स्थापन केला आहे. प्रो फिटनेस हेल्थी ऍक्टिव्ह लाईएफ स्टाईल हा उपक्रम स्वागतार्ह आहे. यामुळे नागरकरांचे आरोग्य सुदृढ  संयमित आणि स्वास्थ्यवर्धक वर्धक राहण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी दिली.

          प्रो फिटनेस या  हेल्थी   लाईफस्टाईल फिटनेस हेल्थ क्लबच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव,  नगरसेविका दीपाली बारस्कर, नितीन बारस्कर माजी सैनिक आणि न्यूट्रीशन कंसल्टंट अँड वेलनेस  कोच अंबादास इंगळे , नितीन भोसले , सौ दीपाली भोसले आदी  उपस्थित होते.
        हेल्दी लाईफ हेल्थ क्लब हि एक आगळी वेगळी संकल्पना असून येथे आहार, विहार, प्राणायाम, योगसाधना याचे मार्गदर्शन सर्वाना करण्यात येणार आहे. बनेसाब पटांगण, संतोषी माता मंदिरामागे, दिल्लीगेट येथे हा क्लब सुरु करण्यात आला आहे. याचे सदस्य होण्यासाठी ८८८८९१८९६२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नितीन भोसले यांनी केले. या क्लबच्या कार्यालयाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
सौ दीपाली भोसले यांनी सर्वांचे औक्षण केले. आरंभ पोलीहेटीव्ह कॅन्सर केअर सेंटरचे चांदभाई शेख, नुट्रीशन कन्सल्टन्ट अँड वेलनेस कोच ज्योती इंगळे, साधना डागा, सविता शिंदे, विमल काटे, किरण ब्राह्मणकर , सचिन बारस्कर, स्नेहलता ओहोळ, अनिल मिसळ, वज्रेश्वरी श्रीपत, संजय बोरा, यावेळी उपस्थित होते.