अहमदनगर तालुका सहकारी दुध व्यवसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित संघाच्या कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण .

अहमदनगर तालुका सहकारी दुध व्यवसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित संघाच्या २७३ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू केलं आहे.
 सर्व कर्मचाऱ्यांची सेवा पुर्ववत कायम करावी,  उपदान, प्रॉव्हिडंट फंड मिळावा , कामबंद संघ भरपाई द्यावी संघाच्या जागा विक्रीच्या शिल्लक निधीतून कर्मचाऱ्यांची देणी थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी आदि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत प्रशासनाने तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.