नवोदयचे आणखी ३० विध्यार्थी कोरोना बाधित .

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सोमवारी ३० कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला . यामुळे येथील कोरोना बाधितांची संख्या ८२ वर पोहोचली आहे . अद्याप ५० ते ६० जणांचा अहवाल येणं बाकी आहे . सर्व कोरोना बाधित विध्यर्थ्याना पारनेर येथील कोविदा सेंटर मध्ये उपचारासाठी ठेवलं आहे . सोमवारी प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार शिवकुमार आवळकंठे ,गट विकास अधिकारी किशोर माने ,तालुका आरोग्याधिकारी डॉ प्रकाश लाळगे , यांनी नवोदय विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया उपाययोजनांची माहिती घेतली . या विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थी कोरोना बाधितांनाच संपर्कात आल्याने सोमवारी पुन्हा ५० जनांचे नमुने घेतले आहेत  दुसरीकडे ५०० च्या वर नमुने आरोग्य विभागाने घेतले असून कोरोना बाधितांचा वाढत्या संख्येमुळे विध्यार्थी शिक्षक धास्तावले आहेत . गेल्या चार दिवसांपासून कोरोना बाधितांची  संख्या वाढत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे .