आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्यासह कुटुंबाला ठार मारण्याची धमकी चे पत्र.

पत्राद्वारे दिलेल्या धमकीची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी.

आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्यासह कुटुंबाला ठार मारण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने पोस्टाने पत्र पाठवून देण्यात आली.धमकीच्या पत्राची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देताना अशोक गायकवाड समवेत अजय साळवे, सुरेश बनसोडे, जयाताई गायकवाड, प्रविणाताई घैसास, भीमराव पगारे, महेश भोसले, विनोद भिंगारदिवे, सुशील अल्हाट, कुसुम सिंह, संदीप पाखरे, येशुदास वाघमारे, राजू वाघ, सतीश साळवे, अमित काळे, राहुल अल्लाट, जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, दिलीप कांबळे, विकी तिवारी, पप्पू पाटील, सुरेश वैरागर आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की मी व माझे कुटुंब बिशप लॉइड कॉलनी सावेडी येथील घरात राहत असून मी एक सामाजिक कार्यकर्ता असून गेली 40 वर्षे मी सामाजिक व राजकीय कार्य करीत असून गेल्या 40 वर्षात माझ्यावर अनेकदा हल्ले करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत पोलिस प्रशासनाने अनेक वेळा पोलिस संरक्षणही दिले आहे तरी शनिवारी 18 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता घरी आलो असता घराच्या प्रवेशद्वाराजवळील गेटवर पोस्टाने आलेले पाकीट दिसले मी सदर पाकीट उघडून पाहिले असता रेखी वहीच्या पानावर लिहिलेला मजकूर वाचला 25 डिसेंबर च्या आत कुटुंबीयांसह बिशप लॉइड कॉलनी सोडून गेले नाही तर तुमची व कुटुंबीयांची निर्घुण हत्या केली जाईल असे लिहिले आहे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नामदार रामदास आठवले यांच्या बाबतीत अपमानकारक मजकूर लिहून त्यांचां देखिल अवमान केला आहे तरी सदर पत्राची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.