आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद .

पारनेर पोलीस स्टेशनचा हद्दीत केलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील तात्पुरत्या  जामिनावर असलेल्या आरोपीला पोलिसांनी गावठी कट्टयासंह जेरबंद केले . अनिल गंगाधर नांगरे ( वय २७ रा. गोरेगाव,पारनेर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून एक कट्टा व तीन जिवंत काडतूस जप्त केले आहे .
आरोपी नांगरे हा गावठी कट्टा घेऊन भाळवणी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनशाम बळप याना मिळाली , या माहितीनुसार पोलीस  पथकाने आरोपीस जेरबंद केलं . निरीक्षक बळप यांचा मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमान उगले , हेड कॉन्स्टेबल जालिंदर लोंढे , पोलीस नाईक अप्पासाहेब ढमाले , सुरज कदम , सागर तोडमल , आदींचा पथकाने कारवाई केली . तसेच पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर कृत्य कोणी करत असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी , माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पारनेर ठाण्याचे निरीक्षक बळप यांनी केले आहे ,