एटीएम कार्ड ची अदलाबदल करून वृद्धास गंडा

अहमदनगर —एटीएम कार्डची अदला  बदल करून अज्ञात इसमाने वृद्धाला ३९ हजार ५०० रुपयाचा गंडा घातल्याची घटना केडगाव उपनगरात घडली . या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीचा विरोधात  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
भास्कर महादेव मोढवे (वय ७४, केडगाव ) हे १६ जानेवारीला १० ते दुपारी २ चा सुमारास केडगाव येथील एसबीआय चा एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते . त्यावेळी त्यांच्यापुढे एक ३० ते ३५ वर्षीय इसम उभा होता . मोढवे यांनी त्यावेळी त्या इसमास पैसे काढून देण्याची विनन्ती केली . त्या इसमाने एटीएम कार्ड घेऊन सांगितलेला पिन नंबर  टाकला . परंतु एटीएम मधून पैशाचा व्यवहार झाला नाही त्या इसमाने पैसे निघत नसल्याचे सांगून एटीएम परत दिले . मात्र दुसऱ्या दिवशी मोढवे बँकेत गेले असता त्यांचा खात्यातून ३९ हजार ५०० रुपये काढले असल्याची धक्कादायक  बाब समोर आली . शिवाय बँकेचा अधिकाऱ्याने हे एटीएम कार्ड तुमचे नसल्याचे सांगता त्या वृद्धाला आपली फसवणूक झाल्याचे  समजले . त्यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढची तपस पोलीस करत आहेत .