एटीएम चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत .

पारनेर तालुक्यातील जवळे  येथील एटीएम फोडून त्यातील तीन लाख २८  हजार रुपये चोरीस गेले होते . या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता .
या बाबत सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे . या सहा आरोपीना न्यायालय हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .
शिरूर निघोज रस्त्यावर जवळे येथे असलेल्या एटीएम मशीन मधून ३ लाख २८ हजार रुपयांची चोरी झाली होती .  हि घटना  १५ डिसेंबर रोजी  घडली होती
.  याबाबत आरिफ खिलजी ( गजानन कॉलनी ,नवनागापूर )  यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती . या गुन्ह्याचा पापड घनश्याम बळप करता होते . बळप यांचा मार्गदर्शनाखाली आरोपी ह्रितिक शिवाजी बेंद्रे रा,पिपंळगाव ता. पारनेर ) याला ताब्यात घेण्यात आले . चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची  कबुली दिली . त्या नंतर ह्रितिक बेंद्रे (वय २०) , उमेश हरिभाऊ सातपुते (वय २२) , तुषार रख माजी पवार (वय २१) , दिनेश हरिभाऊ सातपुते (वय २४) , काळ्या शंकर  धुमाळ (वय २५)  दोघेही राहणार रांजणगाव शिरूर याना अटक  करण्यात  आली .