एलसीबी ची श्रीरामपुरात कारवाई

श्रीरामपूर तालुक्यातील गावठी हातभट्टीच्या अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ७७,५०० रुपये किंमतीची हातभट्टीची साधने व तयार दारूचा साठा जप्त केला . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ विजयकुमार वेठेकर , पोहेकॉ बबन मखरे , पोना ज्ञानेश्वर शिंदे , पोका आकाश काळे , पोहेकॉ उमाकांत गावडे यांचे स्वतंत्र पथक नेमून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते . पथकाने श्रीरामपूर तालुक्यामध्ये मंगळवारी कारवाईची विशेष मोहिम राबवून दोन ठिकाणी छापे टाकत गावठी हातभट्टी व दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची दारू जप्त करून ३ आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे .