कर्जत मध्ये अनोखी शिवजयंती साजरी

सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात अकरा जोडपी विवाहबद्ध.

अहमदनगर —कर्जत मध्ये सकल मराठा समाज व शिवजयंती उत्सव समिती यांच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. राज्य मध्ये प्रथमच अशा पद्धतीने शिवजयंतीच्या निमित्ताने सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. यामध्ये सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा घेऊन जातीय सलोख्याचे आगळं वेगळं दर्शन या ठिकाणी पाहावयास मिळालं . सकल मराठा समाजाच्या वतीने 11 मुलींची लग्ने लावून कन्यादान करण्यात आले . यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते आणि या सर्वांनी या अकरा नव वर-वधू ना शुभेच्छा दिल्या. अकरा विवाहबद्ध जोडप्यांना संपूर्ण पोषाहार मंगळसूत्र फर्निचर भांडी असा सर्व आहेर यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमासाठी सामाजिक राजकीय शैक्षणिक व्यापारी शेतकरी महिला विद्यार्थी युवक-युवती असे सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.

यानिमित्ताने सिनथडी या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते छोटी मराठी व्यावसायिकांनी महिला बचत गटांचे आर्थिक सबलीकरण व्हावे यासाठी हा उपक्रम या ठिकाणी सकल मराठा समाज व समन्वयक धनंजय लहाने यांनी राबवला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले.सर्वधर्मीय विवाह सोहळ्याच्या निमित्ताने कर्जत तालुक्यात सर्व नागरिकांना चुलबंद जेवणाचे निमंत्रण देण्यात आले होते राज्यातील प्रसिद्ध असणारी शिपी आमटीचा  भोजनाचा  आनंद यावेळी नागरिकांनी घेतला .

यावेळी धनंजय लाडाने (समन्वयक सकल मराठा समाज ) म्हणाले कि , सकल मराठा समाज यांच्यावतीने यावेळी अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली . यामध्ये समाजातील सर्वांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि सात दिवस हा सप्त पंधरवडा याठिकाणी साजरा झाला . यामध्ये मोफत सामूहिक विवाह ,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण ,वक्तृत्व स्पर्धा ,क्रिकेट स्पर्धा यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.