काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे सुपारी घेऊन जागा खाली करत असल्याचा आरोप

औसरकर कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करण्याचे षडयंत्र

अहमदनगर :  शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये सुरू असलेल्या वादाला आता वेगळेच वळण प्राप्त झाले असून या प्रकरणातील अजित औसारकर यांच्या कुटुंबियांनी काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मार्केटयार्ड परिसरातील जागेचा वाद हा न्यायप्रविष्ट असताना काँग्रेस पक्षाचे मनोज गुंदेचा ,खलील सय्यद यांनी अनिल औसरकर यांच्याशी संपर्क करून प्रकरणात तडजोड करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता . तसेच आम्ही किरण काळेची माणसे आहोत असा दमही दिला होता . मात्र,  या धमकीला न घाबरता औसरकर कुटुंबियांनी ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितल्यानंतर किरण काळे यांनी सुनिता औसरकर व त्यांच्या पतीला दम देऊन मी किरण काळे आहे .  तुम्हाला मार्केट यार्ड मधील तुमची जागा खाली करून अजय बोरा यांच्या ताब्यात देण्यास सांगितले आहे . मात्र तुम्ही अद्याप पर्यंत जागा खाली केली नाही , त्यामुळे मी मंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकून जेलमधे टाकू शकतो अशी धमकी दिली . तसेच 11 फेब्रुवारी रोजी ऋषभ बोरा हा आमच्या मार्केट यार्ड मधील दुकानात आला व त्याने शिवीगाळ करून आमचे येथील कामगार शोयब सय्यद याला मारहाण केली तसेच हा सर्व प्रकार करून त्यांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.

या सर्व घटनेची पोलिसांनी शहानिशा करावी तसेच या परिसरातील सीसीटीव्ही तपासून घ्यावेत आणि या प्रकरणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे हा औसारकर कुटुंबीयांकडून गळा खाली करून देण्यासाठी अजय बोरा यांच्या कडून सुपारी घेऊन काम करत असल्याने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी व आमच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा .अशी मागणी सुनिता औसारकर यांनी आज अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना निवेदनाद्वारे केली आहे .