हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली

काळा दिवस पाळून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वर्षापुर्वी (सन 2019) पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.14 फेब्रुवारी) हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला. भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क येथे या हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच नुकतेच निधन झालेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर व ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली.

या श्रध्दांजली कार्यक्रमात शहीद जवान अमर रहे! च्या घोषणा देत त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, नगरसेवक किशोर बोरा, दिपक बडदे, दिलीप ठोकळ, सुंदरराव पाटील, सीए रविंद्र कटारिया, सर्वेश सपकाळ, अशोक पराते, विकास भिंगारदिवे, मनोहर पाडळे, संतोष लुणिया, श्रीरंग देवकुळे, सुधाकर चिदंबर, सुर्यकांत कटोरे, किरण फुलारी, जालिंदर अळकुटे, अजय खंडागळे, विनोद खोत, जयराज अवचर, सिताराम परदेशी, आनंद सदलापूर, अभिजीत सपकाळ, आनंद भणगे, विकास निमसे, प्रविण परदेशी, मिलिंद क्षीरसागर, मारुती सोपले, रमेश कोठारी, संतोष ठाणगे आदी उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, सीआरपीएफच्या जवानांनी आपले जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही. आपल्या मातृभूमीच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी बलिदान देणार्‍या देशाच्या वीरांचा आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सर्व नागरिक कृतज्ञ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी राज्यसभेच्या खासदार असताना नगर तालुक्यात पांगरमल सारख्या दुर्गम भागात त्यांनी विकास कामे केली. सप्तसुरांनीही संपन्न असलेल्या लता मंगेशकर यांच्या निधनाने गायन क्षेत्रातील कोहिनुर हरपला त्याप्रमाणे घराघरात पोहोचलेला हमारा बजाज म्हणजेच ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज त्यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात मोठा आधारस्तंभ हरपला असल्याचे त्यांनी सांगितले.