कृषी पंप चोरणारा आरोपी जेरबंद

जामखेड —- जामखेड पोलीस ठाण्यात कृषी पंप चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता . या बाबत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे तपास करत होते . या प्रकरणी आरोपीला जेरबंद करून चार विदयुत पंप जप्त करण्यात आले आहेत .

तपासा दरम्यान हा गुन्हा बाबा दयानंद खाडे याने केला अशी माहिती मिळाली . यावरून बाबा दयानंद खाडे (वय२१ , रा बाबळगव्हाण शिवार ) याचा त्याचा गावात व मित्रांकडे शोध घेऊन तो मिळून आल्याचे त्यास ताब्यात घेतले ,जामखेड पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . हा गुन्हा करते वेळी भाऊ योगेश खाडे आरोपी बाबा खाडे याचा अल्पवयीन मित्र हे त्याचे साक्षीदार असल्याचे सांगितले . बाबा खडे व त्याचा अल्पवयीन मित्राकडून गुन्ह्यातील मुद्देमाल ४ कृषिपंप हस्तगत केले .