कॅन्टोन्मेंट बोर्ड पथकर वसुली नाक्याच्या विरोधात आर्ज देणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांची चौकशी करण्याची मागणी- सुमेध गायकवाड.

भिंगार छावणी परिसरात असलेल्या पथकर वसुली नाक्यांबाबत चौकशीची तक्रार सिद्धार्थ आढाव यांनी केलेली आहे. याबाबत पथकर वसुली करणाऱ्या बालाजी एंटरप्राइजच्या   वतीने पीपल्स रिपब्लिक पार्टीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले व निवेदनात म्हटले आहे की विनाकारण बालाजी एंटरप्राइजच्या संचालिका वैशाली लॉरेन्स स्वामी आणि सुपरवायझर मतीन सय्यद खाजा यांना विघ्नसंतोषी वृत्तीने तक्रार करून त्रास देणाऱ्यासाठी सिद्धार्थ आढाव करत आहे त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर समज द्यावी अशी मागणी निवेदनद्वारे केली आहे.
याबाबत सुमेध गायकवाड यांनी पोलीस अधीक्षकांना  दिलेल्या निवेदनात,  नगर येथील बालाजी इंटरप्राईजेस या फर्म मार्फत नगर शहरानजीकच्या अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या वतीने पथकर वसूल केली जाते. सदर फर्मच्या संचालिका वैशाली लॉरेन्स स्वामी व सुपरवायझर मतीन सय्यद खाजा यांच्या देखरेखीखाली येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून पथकर वसूल केली जाते. या ठिकाणी बहुतांश मुले ही मागासवर्गीय समाजातील असून या व्यवसायातून त्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे. सदर व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे चालविला जात असून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविलेले आहेत. शासनाने अधोरेखित केलेल्या दराने पथकर वसूल केले जाते. त्याबाबत एकाही वाहनचालकांची तक्रार नाही. या ठिकाणी फर्मचे सुपरवायझर मतीन सय्यद यांनी वाहनचालकांची त्यांच्या गैरहजेरी व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांकडून फसवणूक किंवा पिळवणूक होऊन जास्त दर आकारून घेऊ नये म्हणून सूचना फलक लावलेला आहे. तो फलक वाहनचालकांच्या मालकांच्या हिताचा असून त्यात काहीही एक वावगे नाही. परंतु सिद्धार्थ आढाव हे फर्मला बदनाम करण्याच्या हेतूने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार अर्ज करून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. व फर्मचा कारभार अतिशय पारदर्शक असून सदर छावणी परिषदेचे पथकर नाके देशात 22 ठिकाणी आहे पथकर वसुली चे कॉन्ट्रॅक्ट आहे. तसेच फर्मच्या संचालिका वैशाली लॉरेन्स या गृहिणी असून त्यांनी सर्व पॉवर ऑफ अटरणी अधिकार सुपरवायझर मतीन सय्यद खाजा यांच्याकडे दिलेले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार हे  मतीन सय्यद हेच आपल्या सहीने पहात असतात. तरीदेखील वैशाली लॉरेन्स स्वामी यांचा देखील उल्लेख तक्रारदार आपल्या अर्जात नमूद करीत आहेत. सदर व्यवसायात स्वामी व  मतीन सय्यद यांचे नाव भिंगार शहर व जिल्ह्यात मोठे असल्याने समाजात काही विघ्नसंतोषी लोक त्यांना त्यांची प्रगती व लोकप्रियता सहन न झाल्याने व काही अफवांचे लोन ऐकून सिद्धार्थ  आढाव हे  नाहक बदनामी करीत आहेत. तरी आपण याची सखोल चौकशी करून मागासवर्गीय युवकांना रोजगार देणाऱ्या बालाजी इंटरप्राईजेस या संस्थेस योग्य ते सहकार्य करावे तसेच त्यांची बदनामी करणाऱ्यांवर योग्य समज द्यावी, अशी मागणी निवेदनात सुमेध गायकवाड यांनी केली आहे.